मुंबई : पुलवामा हल्ल्यावरून राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे खासदार रोहित पवार यांनी भाजप आणि रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात रोहित पवारांनी ट्विट केलं आहे.
रोहित पवारांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून अर्णब गोस्वामी आणी BARC चे माजी प्रमुख दासगुप्ता यांचे कथित Whatsup चॅट शेअर केले आहे. त्यांनी या स्क्रीनशाॅटमधील पुलवामा हल्ल्यासंदर्भात संभाषण अधोरेखित केलं. या स्क्रीनशाॅटचा आधार घेऊन रोहित पवारांनी भाजपवर टीका केली आहे.
कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे., असं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय.
भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का?
एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे. pic.twitter.com/Q0KicMRgLL— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“आता महाराष्ट्र-मुंबईतील देशी-ओवेसी कोण? ते लवकरच कळेल”
“त्यावेळी धनंजय मुंडेंना शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी”
ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; संतप्त ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ