मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर मनसे नेते मनीष धुरी यांनी यांनी गंभीर आरोप केलेत. या आरोपावर रेणू शर्माने स्पष्टीकरण दिलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत रेणू शर्मा बोलत होती.
मी मनीष धुरींसोबत संपर्क साधला होता. माझा त्यावेळी टेलिव्हिजन कॉर्पोरेशनवर रेणू सायोनारा गाण रिलीज होणार होतं. मात्र टेलिव्हिजन वाल्यांनी माझ्या गाण्याचा अल्बम ठेवून घेतला होता आणि रिलीजही करत नव्हते. यासाठी मी धुरींची मदत मागितली होती. त्यानंतर मनीष धुरी मला रोज संध्याकाळी दारू पिऊन फोन करायचे, असं रेणू शर्मा म्हणाली आहे.
दरम्यान, त्यांनी मला विचारलं की तू कोणासोबत राहतेस?, त्यावेळी मी धुरींना सांगितलं की, मी माझ्या बहिणीसोबत आणि दाजींसोबत राहते. त्यानंतर त्यांनी विचारलं की कोण आहे तुझा दाजी?, तेव्हा त्यांना मी सांगितलं की, धनंजय मुंडे माझे दाजी आहेत. तेव्हा धुरी बोलले की, ओ साला धनंजय मुंडे असं म्हणत त्यांनी शिवीगाळ केली होती. त्यावेळी शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत. हेच मला समजतं नसल्याचं रेणू म्हणाली.असंही रेणू शर्माने सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; संतप्त ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ
“भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन”