मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
सगळी परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेऊ नये, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर ज्या महिलने आरोप केले आहेत, तिच्यावरच इतर व्यक्तींकडून गंभीर आरोप करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. हे खूपच धक्कादायक आहे. अशा प्रवृत्तीला उत्तेजन मिळू नये म्हणून याप्रकरणाची आणखी खोलात जाऊन चौकशी होण्याची गरज आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झालेत; मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांचा टोला
कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री- अनिल देशमुख
…तर मग मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे- रेणू शर्मा
निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- अजित पवार