Home महाराष्ट्र कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री- अनिल देशमुख

कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री- अनिल देशमुख

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर भाजपचे नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनीष धुरी यांनी फसवनुकीचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळच वळण मिळालंय. आता तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचं म्हटलं आहे. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पीडित महिला आपला जबाब नोंदवला जात नसल्याची तक्रार करत असून एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्यासंबंधी अनिल देशमुख यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले की, कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री.. महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल, असं देशमुख म्हणाले.

दरम्यान, कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असंही देशमुख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…तर मग मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे- रेणू शर्मा

निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- अजित पवार

…तर माझा धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक खुलासा

“नीलमताई, सुप्रियाताई, यशोमतीताई दिसल्यास सांगा, 500 रुपये रोख जिंका”