पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.
राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही. राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
दरम्यान, सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवं. शरद पवार म्हणाले हा गंभीर गुन्हा आहे हा कसा घ्यावा हे मुंडे यांनी ठरवावं, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी-
माहिती लपवणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे- निलेश राणे
धनंजय मुंडेंनी त्यांची भूमिका माझ्यापुढे मांडली आहे, मात्र…- शरद पवार
कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुंडे राजीनामा घेणार नाहीत- जयंत पाटील
“भारतीय क्रिकेटर हनुमा विहारीचं भाजप खासदाराला खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाला…”