सांगली : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजड मुंडे यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असून तेच यावर अधिक बोलतील असं सांगितलं, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक जेवढया नैतिकतेची अपेक्षा करत आहेत तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असताना पाळली होती का?,”असा सवाल करत अमोल कोल्हेंनी विरोधकांवर निशाणा साधला. अमोल कोल्हे सांगलीतील म्हैसाळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, विरोधकांनी आता स्वतःला आरशात पाहिलं पाहिजे. त्यांनी जर आरशात पाहिलं तर त्यांच्या मागण्या रास्त ठरतील असं वाटत नाही, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!
धनंजय मुंडे दोषी आढळले तर…; चित्रा वाघ आक्रमक
धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात?; ‘या’ भाजप नेत्याने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार
“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो; 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”