मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरात दाखल होत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता 14 महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी 11 कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली, असं म्हणत ‘उधार‘राजाचे जाहीर आभार, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
मा. मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा
या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला.
पूर्व विदर्भातील ६जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी 11 कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.‘उधार‘राजाचे जाहीर आभार!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 8, 2021
महत्वाच्या घडामोडी-
मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच- उदयनराजे भोसले
“नागपूरमध्ये पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागून इंजिनियरचा मृत्यू”
सरकार मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं; औरंगाबाद नामांतरावर संजय राऊतांचं भाष्य