सचिन सावंतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज- देवेंद्र फडणवीस

0
165

मुंबई : राजस्थानात सत्तासंघर्ष घडवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी 500 कोटी जमवले असा आरोप काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र भाजपावर ज्या कुणी राजस्थान नाट्यासाठी 500 कोटी जमवल्याचा आरोप केला आहे तो कुणी लावला मला मला ठाऊक नाही कारण मी दिल्लीत होतो. पण ज्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हा आरोप केला आहे त्याची आधी मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्यावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे नेते काहीही बडबड करतात. यांचे आरोप कुणाला खरे वाटणार? असं कुठे घडतं का? खरंच मला वाटतं की ज्या काँग्रेस नेत्याने हा आरोप लावला आहे त्याला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

21 तारखेपासून सांगलीत 100 टक्के लॉकडाऊन?; यावर जयंत पाटलांचा खुलासा

भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला यामुळे…; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही- नसीम खान

डॉनला कोरोनाने पकडलंय त्यामुळे घरीच थांबा उगाच डॉन बनू नका; नगरपालिकेची अनोखी जाहिरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here