Home महाराष्ट्र 21 तारखेपासून सांगलीत 100 टक्के लॉकडाऊन?; यावर जयंत पाटलांचा खुलासा

21 तारखेपासून सांगलीत 100 टक्के लॉकडाऊन?; यावर जयंत पाटलांचा खुलासा

सांगली : सांगली जिल्ह्यात मंगळवार पासून शंभर टक्के लॉकडाऊन होणार, अशा आशयाचे मेसेज पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य नाही. अशा आशयाच्या कोणत्याही बातम्यांवर कृपया जनतेने विश्वास ठेवू नये असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झूम द्वारे संवाद साधला. यामध्ये तूर्तास लॉकडाऊन करू नये, पण कोरोणा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची, सोशल डिस्टंसिंग संदर्भातील नियमांची अधिक कडक व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

दरम्यान, सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यास, अनावश्यक गर्दी केल्यास सर्व लोकप्रतिनिधींची व यंत्रणांची पुन्हा बैठक घेऊन लॉकडाऊन संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला यामुळे…; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही- नसीम खान

डॉनला कोरोनाने पकडलंय त्यामुळे घरीच थांबा उगाच डॉन बनू नका; नगरपालिकेची अनोखी जाहिरात

“युजीसी विरोधात आदित्य ठाकरेंनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव”