Home महाराष्ट्र “छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण...

“छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये”

मुंबई : राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून त्यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. एकीकडे औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत असताना काँग्रेसचा मात्र त्याला विरोध आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत नामांतराला विरोध असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे., असं  म्हणत थोरातांनी नामांतराला विरोध दर्शविला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही., असं थोरात म्हणाले. 

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया., असंही थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता; अमोल मिटकरींचा घणाघात

“ठाण्याची श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलियाची ‘मिस इंडिया’!”

अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर

“सगळं नीट “ठरलंय” ना?…नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!”