Home पुणे “हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं”

“हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं”

बारामती : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपबद्दलचा असलेला राग, द्वेष, तिरस्कार यातून एक हाती सत्तेवर आले आहेत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भाजपला हरवण्यासाठी यांना एकत्र यावं लागतंय यातच आम्हाला आनंद आहे. जर हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

हे तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. निवडणुका झाल्यानंतर या तिन्ही पक्षांची आघाडी होते. जर यांनी भविष्यात एकत्रित निवडणूक लढवली तर जनता कोणाला साथ देते हे आपोआप समोर येईल. अस आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीला दिलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं या सरकारपायी हिंदुत्ववादी भूमिका सोडली. सावरकर यांच्यासारखे अनेक समोर आले तरी हे बोलायला तयार नाहीत. सावरकरांच्या कुटुंबियांनी अनेकदा मुख्यमंत्र्याना भेटीची वेळ मागितली मात्री त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

महत्वाच्या घडामोडी-

-“राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार न देता शेतकऱ्यांना मदत करा”

-महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणं म्हणजे द्वेषाचं राजकारण- अमोल कोल्हे

-शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला- देवेंद्र फडणवीस

-सावरकरांबाबत काँग्रेस सेवादलाचं वादग्रस्त पुस्तक; संजय राऊत आक्रमक