मी पुन्हा येईन ही घमेंड नाही तर…; नारायण राणेंचा शरद पवारांवर निशाणा

0
142

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणेंनी सामनामधील शरद पवारांच्या मुलाखतीवर निशाणा साधत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली.

मी पुन्हा येईन यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे. पिंजऱ्यात राहून राज्य चालत नाही, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी सामनातील शरद पवार यांच्या मुलाखतीवर केला आहे.

सत्तेचा दर्प चालत नाही, हे शरद पवार कोणाला बोलत आहेत. शरद पवारांबद्दल मला आदर आहे, मी आदर ठेवूनच बोलतो आहे, असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, एकीकडे कोरोनाचा हाहाःकार सुरु आहे आणि सामनामध्ये ही मुलाखत नेमकी कशासाठी, टीका करायला ? मुलाखतीत राज्याच्या प्रश्नाबाबत तर काही झालं नाही, तीन दिवसांच्या मुलाखतीत काय साध्य केलं ?, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

सामनातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली- नारायण राणे

“महाजॉब्स योजना महाविकास आघाडी सरकारची की, शिवसेना-राष्ट्रवीदीची?”; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सवाल

“धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे शेतकऱ्यांना मिळाले अनोखे गिफ्ट

कोकणचं अजून किती नुकसान करणार हे सरकार?; नितेश राणेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here