“भीमा कोरेगाव हिंसाचाराला देवेंद्र फडणवीस यांची फूस होती”

0
265

पुणे : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फूस होती, असा आरोप बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला.

कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेश्राम यांनी केली. ते मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

उफाळलेल्या या दंगलीमागे मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा हात आहे, असा आरोप मेश्राम यांनी केली आहे. याबाबतचे पुरावे भारत मुक्ती मोर्चाकडे आहेत, असंही वामन मेश्राम यांनी सांगितलं आहे.

पुरावे उच्च न्यायालय आणि चौकशी आयोगासमोर सादर करण्यात आले आहेत. यानंतरही तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना क्लिनचिट दिली आहे, असं मेश्राम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-“तुम्ही संपूर्ण वेळ ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”

-‘हा’ नेता म्हणतोय शंभर टक्के सांगतो महायुतीचं सरकार पुन्हा येईल

-राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘हा’ आमदार देणार राजिनामा

-कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शपथविधीचा व्हीडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here