Home पुणे “आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही”

“आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही”

पुणे : राजकीय व्यक्तीचे आयुष्य हे 5 वर्षांचे असल्याने नेत्याला 5 वर्षांनी जनतेसमोर जावे लागते. त्यामुळे आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवाजीनगर पुणेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रथम वर्ष कार्यअहवालाचं प्रकाशन फडणवीसांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

आमचे नेते जर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक असतील तर आम्ही कोणीच मालकाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी या सेवकाने मालक असलेल्या जनतेप्रति उत्तरदायी असलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, नेत्याला जर आत्मविश्वास नसेल तर समाजाने कोणाकडे पाहायचे? फलक लावून दादा-भाऊ होणारे खूप झाले आहेत. पण अशाने नेता होता येत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“बाळासाहेब ठाकरेंनी तीस वर्षांपूर्वीच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केलं”

…मग गांधीची हत्या करणारा गोडसे कोण होता?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल

तुम्हांला जर जमत नसेल, तर…; नवनीत राणांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन”