ज्यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं त्यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं?- एकनाथ खडसे

0
228

बीड :  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळाव्याचं आयोजन केलं . यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं. त्यामुळेच तुम्ही, मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात. मात्र त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं आलं?, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, त्यांचं वाक्य नेहमी आठवतं, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम्हे साथ लेकर डुबेंगे, जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, तोच प्रसंग माझ्याही आयुष्यात, असंही खडसे म्हणाले.

पंकजा पक्ष सोडणार नाही… पण माझं सोडा…  माझा भरोसा धरू नका, असा इशारा त्यांनी भाजपला दिला तसंच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत देखील दिले.

महत्वाच्या बातम्या-

“पक्ष माझ्या बापाचा आहे, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही”

भारताचा विराट विजय; 67 धावांनी उडवला विंडीजचा धुवा

मंत्रालयात आज बिनखात्याच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here