सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ; संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद

0
142

मुंबई : मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या बैठकीत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

छत्रपती संभाजीराजे यांना व्यासपीठाखाली बसवल्यामुळे मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला. जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला.

संभाजीराजे यांनी मात्र मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही, अशी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत राजेंना वरती येण्याचा आग्रह केला.

दरम्यान, संभाजी राजे यांनी आपण सामान्य जनतेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तिसऱ्या रांगेत बसण्याची तयारी दर्शवली. गोंधळ घालू नका. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करू. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे, असं आवाहन त्यांनी मराठा समाज समन्वयकांना केले.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय

उद्धवजी पण गारद का?; फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरुन टोला

ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?; संजय राऊतांचा शरद पवारांना सवाल

आशिया चषक होणार का नाही?; सौरव गांगुलीने केला निर्णय जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here