पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी आज कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा, अशी मागणी केली आहे.
हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला तर तो सर्व मुलांनाही कळेल. त्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहीन व त्यांच्याशी चर्चाही करेन, असं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, देशात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच देशातील दलित-सवर्ण हा वाद मिटला पाहिजे. गावागावात एकी झाली पाहिजे. सवर्ण आणि दलितांमध्ये एकी झाली की, देशाचा विकास झपाट्याने होईल, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? मातोश्रीबाहेर मनसेचा बॅनर
“कबीर सिंग फेम अभिनेत्री वनिता खरातचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यूड फोटोशूट”
बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे…; कॅलेंडरवरुन भाजपची शिवसेनेवर टीका
“तुम्ही संपादिका आहात…,” चंद्रकात पाटील लिहिणार रश्मी ठाकरेंना पत्र