Home महाराष्ट्र “राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

“राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

मुंबई : कोरोनाचा धोका लक्षात घेऊन 31 जानेवारी 2021 पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून याबाबत राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी काल याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे.

लाॅकडाऊनचा कालावधी महिनाभरासाठी वाढविण्यात आला असला तरी लागू करण्यात आलेल्या सवलती कायम असतील. तर प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू असलेले निर्बंध कायम असतील. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री 11 पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. रात्रीच्या जमावबंदीचेही आदेश लागू आहेत.

दरम्यान, रात्री घराबाहेर पडता येणार नाही. घराबाहेर जाऊन औषधे आणणे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत., असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राम शिंदेंनी केलेल्या टीकेला रोहित पवारांच प्रत्युत्तर; म्हणाले…

कोल्हापूर! अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी महाद्वार उघडणार; दर्शन वेळेतही वाढ

“महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात भाजप कधीच यशस्वी होणार नाही”

ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडूंचा मोदी सरकारवर हल्लाबोल