कोल्हापूर : करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिराचे महाद्वार म्हणजेच पश्चिम दरवाजा खुला करून भाविकांना गरूड मंडप व गणपती चाैकातून देवीचे मुखदर्शन घेता यावे, अशी व्यवस्था 1 जानेवारी 2021 पासून करण्यात येणार असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने करवीर निवासीनी अंबाबई, दख्खनचा राज जोतिबासह देवस्थानच्या अखत्यारीतील सर्व मंदिरं सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय मंदिर समितीनं काल घेतला.
दरम्यान, नववर्षापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. तसेच 2 दिवसांपूर्वी मंदिरे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यात परत बदल करून ही वेळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी वाढवण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात भाजप कधीच यशस्वी होणार नाही”
ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडूंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
सीरम इन्स्टीट्यूटच्या सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; मनसेची मागणी
एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…; राम कदमांची टीका