मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपने कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना यामध्ये कधीच यश मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
आधी त्यांना दोन महिन्यात सरकार पाडायचं होतं, मग सहा महिन्यात सरकार पाडणार होते, आठ महिन्यातही सरकार पाडणार होते. पण यापैकी काहीही होऊ शकलं नाही, असं म्हणत शरद पवारांनी भाजपला टोला लगावला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्षांसाठी स्थिर आहे. सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडूंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
सीरम इन्स्टीट्यूटच्या सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; मनसेची मागणी
एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…; राम कदमांची टीका
“एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण?”