मुंबई : राम मंदिरासाठीच्या वर्गणीचे काम येत्या संक्रातीपासून सुरू होत आहे. 12 कोटी कुटुंबांसोबत स्वयंसेवक संपर्क साधणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितलं होतं. यावर शिवसेनेनं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून निशाणा साधला होता. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’., असं ट्विट करत निलेश राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’. https://t.co/gpka5hVjRM pic.twitter.com/O1jRWPH7fv
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
एवढी का तणतण करत आहेत?; आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला
“शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”
राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?;- चित्रा वाघ
ईडीच्या चौकशीला घाबरून नारायण राणेंचा भाजपमध्ये पळ; शिवसेनेचा हल्लाबोल