अहमदनगर : सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. ते अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलत होते.
मी त्यांना जानेवारी महिन्याची मुदत दिली आहे. जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मी आमरण उपोषणाला बसेन. हे माझं शेवटचं आंदोलन असेल, असं अण्णा हजारे म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी मी गेल्या 3 वर्षांपासून आंदोलन करत आहे, पण सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. हे सरकार केवळ पोकळ आश्वासनं देत आहे. त्यामुळे माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही, असं म्हणत अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही”
“मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”
शरद पवार यांना पाठवलेली नोटीस का मागे घेतली?- नवाब मलिक
…तर उत्तर द्यावेच लागेल; ईडी नोटीसवरुन किरीट सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल