मुंबई : मागच्या 5 वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या… त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल…, असं ट्विट करत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या… त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 16, 2020
महा भकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही. अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि ११० कोटींची वांगी किती काळ चालणार? असं म्हणत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
महा भकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही.
अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि ११० कोटींची वांगी किती काळ चालणार?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अजित पवार तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता; निलेश राणेंचा टोला
“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”
कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचू लागले आहेत; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
मराठा तरुणांना आरक्षण न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू- देवेंद्र फडणवीस