मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार कंत्राटदारधार्जिणं झालं आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च या बंगल्यांवर करण्यात आला आहे. जलसंपदा विभाग, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. आरोग्य विभागावर जी तरतूद आहे. त्यात 50 टक्केही खर्च करण्यात आलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे, असं म्हणत दरेकरांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत कशावर खर्च करायचा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्याययचं याचं भान असायला हवं. पण कंत्राटदारांचे हित आणि त्यातून मिळणारा मलिदा याकडे या सरकारचं लक्ष असून हे सरकार कंत्राटदार धार्जिणं झालं आहे, असं म्हणत दरेकरांनी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
गेल्या 5 वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?- विजय वडेट्टीवार
“काँग्रेसच्या ‘या’ नेत्यामुळं शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं”
“ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही”
“भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण”