नाशिक : सध्याचं राजकीय वातावरण बदललं असून आम्हीसुद्धा नाशिकपासून कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे कोणी काहीही केलं तरी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल, असं वक्तव्य शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या अनुषंगाने पाहिलं तर शिवसेना पहिल्या नंबरवर आहे. मात्र सर्वांचा सन्मान राखूनच निवडणुक होतील, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहणार आहे आणि नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होईल., असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी-
औरंगाबादचा विकास वेगाने होणार, मला विकास कामे करण्याची घाई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं रोख बक्षीस”
“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”
पवार कधी शिवसेनेला तंगडं वर करायला सांगतील आणि कधी…; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला