करमाळा : करमाळा तालुक्यातील केडगाव शिवारात ऊसतोड मजुराच्या मुलीचा बिबट्याने जीव घेतल्यानंतर गावात दहशतीचं वातावरण आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभाग अथक अपयशी ठरलं. यानंतर करमाळा तालुक्यातील वांगी सांगवी याठिकाणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
येत्या 2 दिवसांमध्ये बिबट्याला पकडण्याचा निर्धार वन विभागाच्या अधिकार्यांनी केला आहे. तसेच आता रोहित पवार यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं आहे. रोहित पवार यांनी बॅटरी व काठी घेऊन वनअधिकारी यांच्या बरोबर पाहणी केली.
दरम्यान, बिबट्याचं संकट टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राणाची शिकस्त करून हा बिबट्या जेरबंद करावा अशा सूचनाही यावेळी रोहित पवारांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
“धक्कादायक! नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आज्जी आणि लहान भावाची निर्घृण हत्या”
अभिनेत्री सनी लिओनीचा मराठमोळा नऊवारीतील किलर लूक पाहिलात?
“गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी”