मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद थांबताना दिसत नाहीये. अमृता फडणवीस यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेल यांना टोला लगावला आहे.
Having a bad leader was not Maharashtra’s Fault – But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019
अमृता फडणवीस या Axis Bank मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्या बँकेतून तब्बल 2 लाख पोलिसांचे सॅलरी अकाउंट्स SBI मध्ये वर्ग करण्याचा सरकारचा निर्णय असल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरूनच अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. मात्र अशा प्रकारे खाते वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार मला आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहे,’ असा आरोपही अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकेर यांच्यावर केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि भाजपचं रक्त एक आहे- चंद्रकांत पाटील
-उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री- नारायण राणे
-ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवीन वर्षात ‘हा’ होणार बदल
-अमृता फडणवीस वैफल्यग्रस्त; ठाकरे अडनाव वरती टीका करावी इतकी त्यांची उंची नाही- रुपाली चाकणकर