बुलढाणा : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर इथं रोखून धरली. त्यावेळी पोलिस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारनं तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाण्यात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आज सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेले पहायला मिळालं.
महत्वाच्या घडामोडी-
आर्चीच्या ‘या’ नव्या लूकनं पाडलीय भुरळ; पहातच राहाल
राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले- बाळासाहेब थोरात
झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा- अशोक चव्हाण