पुणे : आम्ही सत्तेत नसलो किंवा सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि भाजपचं रक्त एक आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
आमच्यातलं भांडण आम्ही सोडवू जयंत पाटील यांनी वकिली करायची गरज नाही, असंही ते म्हणाले. ते पुणे जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
जयंत पाटील शिवसेनेचे वकिल झालेत का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळा केला. एखाद्याने अधिक काळ सत्तेमध्ये राहण्यासाठी किती वकिली करावी, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.
आमच्यातलं भांडण आम्ही सोडवू जयंत पाटील यांनी वकिली करू नये. आणि आम्ही 25 वर्ष फसवलं असं शिवसेना म्हणेल. आणि फसवलं असतं तर शिवसेना कशी काय राहिली?, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री- नारायण राणे
-ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवीन वर्षात ‘हा’ होणार बदल
-अमृता फडणवीस वैफल्यग्रस्त; ठाकरे अडनाव वरती टीका करावी इतकी त्यांची उंची नाही- रुपाली चाकणकर