मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात झोपेचे सोंग घेणाऱ्या केंद्राला जागे करण्यासाठी ८ डिसेंबरचा भारत बंद महत्वाचा आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, असं अशोक चव्हाण म्हणाले
अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले- बाळासाहेब थोरात
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळं निधन
शेतकरी आक्रमक: उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक; उद्या फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू