नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.
या बंदवेळी दुपारी तीन वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही. अशी माहिती सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिली आहे.
8 तारीख को सुबह से शाम तक भारत बंद रहेगा। चक्का जाम शाम तीन बजे तक रहेगा। दूध-फल-सब्ज़ी पर रोक रहेगी। शादियों और इमरजेंसी सर्विसेज़ पर किसी तरह की रोक नहीं होगी: सिंघु बॉर्डर पर जय किसान आंदोलन से योगेंद्र यादव pic.twitter.com/gvc14gxSLR
— ANI_HindiNews (@AHindinews) December 6, 2020
महत्वाच्या घडामोडी-
कुंफू पांड्याची मॅच विनिंग खेळी: भारताची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली
मैथ्यू वेड-स्टीव्ह स्मिथची आक्रमक खेळी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 195 धावांचे लक्ष्य
केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना उत्तर