Home महाराष्ट्र पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला- हसन मुश्रीफ

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला- हसन मुश्रीफ

सिंधुदुर्ग : भाजपचा जो उन्माद आणि माज होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला., असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. हसन मुश्रीफ सध्या सिंधुदुर्ग दाैऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

हे फक्त सरकारचं लक्ष विचलीत करण्याचं काम करत आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक बघून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला, असा टोलाही हसन मुश्रीफांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

आता महाविकास आघाडीचं सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार- प्रवीण दरेकर

कंगणा रणाैत म्हणजे हिमाचलचं सडलेलं सफरचंद; ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोला

“पुण्यातील ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी लागू”

“‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”