पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आळंदी या भागात उद्यापासून संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पिंपरीचे पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पर यांनी सांगितलं आहे.
आषाढी आणि कार्तिकी वारीनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन सोहळा असतो. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र आंळदी येथे 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये संचारबंदी असणार आहे.
दरम्यान, पंढरपूरहून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या श्री. पांडुरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या 3 दिंड्यांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये एका पालखीसोबत केवळ 20 वारकऱ्यांना परवानगी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”
अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवीन CUTENESS फोटोशूट; फोटो बघून चाहते घायाळ
“स्वत:चं अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड”
तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरुन मृत्यू