रत्नागिरी : उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत, असं म्हणत भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीला जाऊन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना विचारतात. असं नारायण राणे म्हणाले. ते रत्नागिरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे
मुख्यमंत्र्यांना राज्याची काही माहिती नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शरद पवार आणि जयंत पाटील देतात. असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा काय विकास करणार, असंही राणेंनी म्हटलं.
राज्याची निधी देण्याची क्षमताच उरलेली नाही. ते शहर विकासाला निधी उपलब्ध करुन देऊ शकत नाही, असंही राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
-ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवीन वर्षात ‘हा’ होणार बदल
-अमृता फडणवीस वैफल्यग्रस्त; ठाकरे अडनाव वरती टीका करावी इतकी त्यांची उंची नाही- रुपाली चाकणकर
-रोहित पवारांना मंत्रिपद द्या; पक्षातील तरुणांचं शरद पवारांना पत्र
-‘या’ कारणामुळे दिपीका पुन्हा झाली भावूक