Home क्रीडा टी.नटराजन-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी; भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

टी.नटराजन-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी; भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा  11 धावांनी पराभव केला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावत 161 धावा केल्या. भारताकडून के.एल.राहूलने सर्वाधिक 40 चेंडूत 51 धावा, रविंद्र जडेजाने 23 चेंडूत 44 धावांची नाबाद आक्रमक खेळी करून भारताला 160 चा पल्ला गाठून दिला. तर संजू सैमसनने 15 चेंडूत 23 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून माॅयझेस हेनरिक्सने सर्वाधिक 3 विकेट, मिशेल स्टार्कने 2, तर अॅडम झम्पा व स्वीप्सनने 1 प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 7 गडी गमावत 150 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरोन फिंच 26 चेंडूत 35 धावा, डी.आर्सी शाॅर्ट 38 चेंडूत 34 धावा तर माॅयझेस हेनरिक्सने 20 चेंडूत 30 धावा केल्या. भारताकडून युझवेंद्र चहल व टी.नटराजनने प्रत्येकी 3 तर दीपक चहरने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेनं भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”

के.एल.राहूल-रविंद्र जडेजाची वादळी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचे लक्ष्य

हिंमत असेल तर एकएकटे लढा; चंद्रकांत पाटलांच महाविकास आघाडीला आव्हान

फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही- एकनाथ खडसेंचा टोला