Home महाराष्ट्र “महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेनं भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”

“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेनं भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकांअगोदर भाजप नेत्यांनी सहाच्या 6 जागा भाजपच्या येतील असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र भाजपला अवघ्या एका जागोवर समाधान मानावं लागलं आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही., असं रोहित पवार म्हणाले.

भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी मविआसाठी निष्ठेची होती.राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली.या निवडणुकीत जनतेने मविआची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली., असं ट्विट करत रोहित पवारांनी भाजपला टोला लगावला आहे. 

महत्वाच्या घडामोडी-

के.एल.राहूल-रविंद्र जडेजाची वादळी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचे लक्ष्य

हिंमत असेल तर एकएकटे लढा; चंद्रकांत पाटलांच महाविकास आघाडीला आव्हान

फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही- एकनाथ खडसेंचा टोला

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती- सुप्रिया सुळे