Home महाराष्ट्र अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. 14 आणि 15 डिसेंबरला हे अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. यावरुन विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

अधिवेशन केवळ दोन दिवसांचं होतंय. मात्र महाराष्ट्रात असनेक असून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांसाठी सर्व सदस्य योग्य ती काळजी घेऊन येणार असतील तर दोन आठवड्यांचं अधिवेशन घेतलं पाहिजे, अशी आमची मागणी होती. ती आमची मागणी मान्य झालेली नसल्याचं,” देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही”

“पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ कार अपघातात 2 जण ठार”

भाजपनं दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला; शिवसेनेचा टोला