Home महाराष्ट्र बॉलिवूड मुंबईबाहेर नेणं हे खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का?- योगी आदित्यनाथ

बॉलिवूड मुंबईबाहेर नेणं हे खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का?- योगी आदित्यनाथ

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशी फिल्मसिटी उभारण्याचा संकल्प केला होता. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुंबईतील बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात नेण्याचा योगी सरकारचा डाव असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती. याविषयी योगी आदित्यनाथ यांना सवाल करण्यात आला. या प्रश्नाला योगी आदित्यनाथ यांनी खास शैलीत उत्तर दिलं. मी काहीही हिसकावून घेण्यासाठी मुंबईत आलेलो नाही. बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेणे हे काय खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का? असा प्रतिप्रश्न योगी आदित्यनाथांनी माध्यमांना केला.

दरम्यान, ही केवळ एक स्पर्धा आहे. ज्यामध्ये चित्रपटसृष्टीला चांगल्या सुविधा आणि सामाजिक सुरक्षा कशाप्रकारे पुरवता येईल, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आम्हाला मुंबईतील लोकांच्या अनुभवाचा लाभ घ्यायचा आहे. जेणेकरून उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाच्या सुविधा उभारणे शक्य होईल. त्यासाठी मी चित्रपटसृष्टीतील लोकांशी संवाद साधला.


महत्वाच्या घडामोडी-

“तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय”

हार्दिक पांड्या-रविंद्र जडेजाची फटकेबाजी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचे लक्ष्य

“बॉलिवूड अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण”

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ठग; मनसेचा योगी आदित्यनाथांना अप्रत्यक्ष टोला