मुंबई : सुधारित नागरीकत्व कायदा आणि नागरिक नोंदणी या दोन गोष्टींमुळे देशभरात आंदोलन तीव्र होत चाललं आहे. यावर अभिनेते मकरंद अनासपुरेने मत व्यक्त केलं आहे.
माझं वैयक्तिक मत असं आहे की, सध्याच्या राजकारणात कोणही विश्वास ठेवण्या योग्य राहिलं नाही. राजकारणाचं नुसतं भजं झालंय. खंत वाटावी अशी ही परिस्थिती आहे. पूर्वीचे नेते ज्या ताकदीने, ज्या निष्ठेने काम करत होते, ज्या निष्ठेने उभे राहिले होते त्याचं शेवटपर्यंत त्यांनी पालन केलं होतं. अलिकडच्या काळात असं खूप कमी घडतं, असं म्हणत मकरंद अनासपूरेने राजकारण्यांवर टीका केली आहे.
जेव्हा सरकार कुठलाही निर्णय घेतं, तेव्हा त्याच्यावर भाष्य करताना किंवा प्रतिक्रिया देताना त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करुन प्रतिक्रिया द्यायला हवी. अनेकांच्या प्रतिक्रियांवरुन कळतच नाही की नेमकं हे काय चाललं आहे. बऱ्याचदा शासनाविरुद्ध व्यवस्थापन कार्यरत असतं, त्यांना त्यांचं काहीतरी साधून घ्यायचं असतं, असंही मकरंद अनासपूरे म्हणाला.
महत्वाच्या घडामोडी-
-संजय राऊत यांचा ट्वीटवरून भाजपवर निशाणा, म्हणातात…
…म्हणून आदित्य ठाकेर निवडणूक जिंकले, त्याला Z सुरक्षा कशाला- निलेश राणे
-ठाकरे सरकार अमृता फडणवीसांना धक्का देणार?
-महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार- उद्धव ठाकरे