मुंबई : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
राष्ट्रवादीत प्रवेश करताना आता मी मोकळा श्वास घेत असल्याचं गायकवाड म्हणाले. भाजपमध्ये अस्वस्थ व्हायचं. कोंडमारा झाल्यासारखं वाटायचं. या लोकांच्या पाठीमागे उभं राहणं शक्य नाही. त्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला., असंही गायकवाड म्हणाले.
दरम्यान, कुणाला साथ द्यायची, कुणाची घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे मनमानी चालली आहे. कामाचा पत्ता नाही. पण मी पणा भरपूर आहे. अशा लोकांशी कसं काम करायचं, असा सवालही गायकवाड यांनी केला.
महत्वाच्या घडामोडी-
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरूण गोगाई यांचं निधन”
प्रताप सरनाईक काही साधुसंत नाही; सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा निशाणा
आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या- संजय राऊत