मुंबई : कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का? असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
दिवाळीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याने ते काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरेंनी मिशन बिगीन अगेनच्या अनुषंगाने कोणतीही नवी घोषणा केली नाही. मात्र, अनलॉकची मागणी करणाऱ्या विरोधकांना त्यांनी चांगलंच सुनावलं आहे.
दरम्यान, बाकीच्यांचं ठिक आहे. मला यात राजकारण आणायचं नाही. हे उघडा ते उघडा म्हणता… उघडतो. सगळं उघडतो. जबाबदारी घेता का? असा सवाल करत राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढी जबाबादारी माझ्यावर आहे. तेवढी जबाबदारी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असं टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
महत्वाच्या घडामोडी-
सगळं उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माझे लाईट बिल, माझी जबाबदारी, सोमवारी भेटूच…शॉकसाठी तयार राहा; मनसेचा सरकारला इशारा
पदवीधर निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार- प्रविण दरेकर
तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो; राज ठाकरेंचा रूपाली पाटील ठोंबरेंना मेसेज