‘आयपीएल’वर कोरोनाचं सावट! KKR चे 2 खेळाडू पाॅझिटिव्ह; आजचा सामना पुढे ढकलला

0
203

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वावर (IPL 2021) कोरोनाचं सावट आलं आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या वरूण चक्रवर्ती आणि संदीप वाॅरियर या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सोमवारी आज होत असलेल्या आयपीएल सामन्यात केकेआरच्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला आहे., असं पीटीआयनं माहिती दिली आहे.

दरम्यान, वरूण चक्रवर्ती हा नुकताच त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी बायो बबलच्या बाहेर गेला होता. त्याच वेळी कोरोनानं त्याला गाठलं असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर वगळता केकेआरचे बाकीचे खेळाडू ठीक आहेत. त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल”

“भारतनाना माफ करा, तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले”

पंढरपूर पोटनिवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे श्रेय या बंगालच्या वाघिणीला द्यायला हवं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here