मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीटवरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमृता फडनवीस यांना टोला लगावला आहे.
जर एखादी व्यक्ती आपलं मत व्यक्त करत असेल तर त्याला लोकशाही म्हणतात. ही लोकशाही आहे मात्र भाजप लोकशाहीचा विचार करत नाही. लोकशाही ही तर खरी ताकद असून ती ताईंना कळली. मात्र इतर भाजपच्या लोकांना ती कळावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन. तसेच इतरही आमदार महत्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करतोय, संधी द्यायची की नाही हे पार्टी ठरवेल. मात्र या जिल्ह्यावर अन्याय होऊन देणार नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, ठाकरे आडनाव असलं तरी कोणी ठाकरे होत नाही. कुटुंब आणि सत्तेपलीकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिक काम करावं लागतं, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
महत्वाच्या घडामोडी-
-देशातील भाजपची भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली- शरद पवार
-ही तुम्हाला असहिष्णुता वाटत नाही का? आशिष शेलारांचा शरद पवारांना सवाल
-स्मार्टफोन कंपनी Apple ‘हा’ APP प्ले स्टोअरमधून हटवला
-“जनतेला गृहीत धरंल की, वेगळं काय घडणार”