मुंबई : बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा निषेध करत भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला अॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?, असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.
महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“नवनीत राणा आणि रवी राणा पोलिसांच्या ताब्यात”
“प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळणाऱ्या बीडच्या नराधमाला नांदेडमध्ये अटक”
“महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारूण पराभव”
“धक्कादायक! बीडमध्ये प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न”