पुणे : महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांकडून बिहारमधील यशाचं श्रेय बिहार विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना दिलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला, अशी मिष्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली. या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या. मात्र, नितीश कुमार यांचे फार नुकसान होण्याची भीती होती, तसे घडले नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात- निलेश राणे
आयपीएल 2020 फायनल! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे- नितेश राणे