Home महाराष्ट्र तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार

तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार

मुंबई : देशभरातील जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी खूप मेहनत घेतली. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज असला तरी तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे, असं म्हणत शरद पवार यांनी तेजस्वी यादव यांचं काैतुक केलं आहे.

दरम्यान, बिहारमध्ये भाजप विरुद्ध एकटे तेजस्वी यादव अशीच निवडणूक पाहायला मिळाली. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपला हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये ते शब्द फिरवणार नाहीत”

“तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत”

“धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल”

“देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यांनेच बिहारमध्ये भाजपला यश”