मुंबई : तब्बल 3 दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारली आहे. यानंतर जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने नमस्ते ट्रम्प म्हटले असले तरी सुज्ञ अमेरिकन जनतेने ट्रम्प यांना बाय बाय करुन आपली चूक सुधारली आहे, असं म्हणत शिवसेनेने नरेंद्र मोदी आणि भाजपला टोला लगावला आहे.
दरम्यान, जनता हीच सर्व श्रेष्ठ आणि शक्तिमान आहे. अमेरिका आणि बिहारच्या जनतेचं कौतुक करावं तेवढं कमीच, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“ड्रग्जप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड”
एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन आज मिळेल, तर दुसरे वेतन दिवाळीच्याआधी मिळेल- अनिल परब
तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. अशा पद्धतीने सरकार चाललंय; गिरीश महाजनांची महाविकास आघाडीवर टीका
“अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला”