“विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे, म्हणूनच मी दिल्लीच्या प्रचाराला आले”

0
523

नवी दिल्ली  : विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे, म्हणूनच मी दिल्लीच्या प्रचाराला आले आहे, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

मला दिल्लीत जास्त कुणी ओळखत नाही. मी दिल्लीत लोकप्रिय नाही. पण लोक मला माझ्या वडिलांच्या नावाने ओळखतात. विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे. म्हणूनच अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांनी आम्हाला दिल्लीच्या प्रचाराला बोलावलं आहे, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतलं झाडूवालं सरकार यावेळी दिल्लीतून हटवा. दिल्ली या देशाचं मुकुट आहे. ते मुकुट नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर ठेवा, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले असून महाराष्ट्रातील भाजपचे नेते दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत, पंकजा मुंडे यासुद्धा दिल्लीत प्रचाराला आल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतुद- निर्मला सितारमण

पुन्हा सुपरओव्हर पुन्हा भारताचा विजय

“पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही”

…म्हणून आंबेडकर स्वीकारायचं की गोळवलकर हे देशानं ठरवावं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here