Home महाराष्ट्र दहावी-बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावी-बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा उघडणार, असे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार 10 वी आणि 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दहावी आणि बारावीचे‌ वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ प्रस्ताव आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. त्याबाबत नियमावली, सूचनाही अद्याप जाहीर झालेल्या नाही, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता व्हॉट्सऍपवरूनही पैसे पाठवता येणार

मुंबई इंडियन्स फायनलमध्ये! बुम-बुम-बुमराची शानदार गोलंदाजी; मुंबईचा दिल्लीवर 57 धावांनी विजय

भाजप म्हणजे उसात शिरलेला हत्ती- सतेज पाटील

दिवाळीच्या तोंडावर ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; येत्या सोमवारपासून थेट खात्यात पैसे जमा होणार