मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विधानसभेत विरोध दर्शवत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्रा आव्हाड यांनी हा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझी जात वंजारी आहे, असं वक्तव्य केलं होतं. आता जितेंद्र आव्हाडानी एक कविता शेअर करत याबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे.
ही माती माझी ओळख सांगते. ‘ह्या मातीत आहे राख आमच्या बा च्या बा ची, कुठून आणू कागद दाखवायला माझ्या ओळखीची, तेव्हा बी गोळ्या झेलल्या आज बी झेलू, ह्या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू,’ अशी कविता शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षही या कायद्याला विरोध करत आहेत. महाराष्ट्रात भाजप वगळता इतर पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही या कायद्याला आक्षेप घेतला आहे
महत्वाच्या घडामोडी-
-महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या विश्वासघाताची मालिका कायम ठेवली- चंद्रकांत पाटील
-शेतकऱ्याचं कर्जमाफ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची मोठी घोषणा
-निलेश राणे यांनी केली संजय राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट